सत्ता गेल्यानंतर काही लोक गेले पण आता नवीन नेतृत्व तयार झालंय – शरद पवार

sharad pawar

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर शरद पवारांनी स्वतंत्र मोट बांधत राष्ट्रवादी काँग्रेसची बीजं पेरली. तिच राष्ट्रवादी काँग्रेस आज राज्यातील सत्तेत महत्त्वाच्या भूमिकेत वावरताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी संघटना उभी करण्याची भूमिका स्वीकारली, ती कितपत योग्य होती याचा आढावा घ्यायचा आजचा दिवस आहे असं म्हंटल आहे.

सत्ता ही केंद्रीत व्हायला नको. तसं झालं तर ती भ्रष्ट होते. सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला आपण या सत्तेचा भाग असल्याची जाणीव झाली पाहिजे. आज राष्ट्रवादीचा प्रवास बघता, पक्षाने महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी निर्माण केली आहे. असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

सत्ता गेल्यानंतर काही लोक गेले पण आता नवीन नेतृत्व तयार झालंय, आधी त्यांचं कतृत्व कधी दिसलं नाही पण या आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.

आजचं मंत्रिमंडळ बघितलं तर अनेक सहकारी जबाबदारी पेलत आहे. त्यांचे कर्तृत्व या आधी दिसलं नव्हतं. कोरोना काळात राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेल्या कामाची स्तुती शरद पवार यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

IMP