भारतानंतर आता अमेरिकेने चीनला दिला ‘हा’ दणका

donald trump & narendra modi

वॉशिंग्टन: भारत-चीन सीमेवरील वारंवार वाढणारा तणाव, चीनची घुसखोरी, भारतातील व्यापार क्षेत्रात चीनचे असलेले वर्चस्व या सगळ्या बाबी लक्षात घेता भारत सरकारने आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. तसेच यानंतर, सॉफ्टवेअर स्ट्राईक करत भारताने चिनी ऍप्सवर बंदी घातली. १,२ नव्हे तर तब्बल ५९ मुख्य ऍपसह क्लोन केलेल्या ऍप्सवर देखील नुकतीच बंदी घालण्यात आली.

भारताने उचललेले हे पाऊल सुरक्षेसाठी गरजेचे असून अनेक चिनी ऍप्स युजर्सचा डेटा लिक करून तो हैकर्सला पुरवत असल्याचा दावा भारताने केला होता. तर, आता चीनला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतानंतर अमेरिकेत टीकटॉक (TikTok) वरही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की सुरक्षेचा धोका लक्षात घेता आम्ही टीकटॉक बंदी घालत आहोत.

महसूल दिनापासून डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा होणार उपलब्ध

टीकटॉक हे मनोरंजन करणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय ऍप्सपैकी एक होते. भारतात कोट्यवधी युजर्स असल्याने कंपनीला प्रचंड नफा प्राप्त होत होता. मात्र, आता चीनला घेरण्याचा चांगलाच डाव आखला जात असून चीनचे जगावर सत्ता गाजवण्याच्या मुत्सद्देगिरीवर वेळीच रोख आणणे गरजेचे आहे. एअरफोर्स वनवर  (Air Force One) पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘जिथपर्यंत टीकटॉक  चा प्रश्न आहे, आम्ही त्यावर बंदी घालतोय’. भारताने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेत चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. अनेक खासदार आणि एजन्सींनी टीकटॉकवर हेरगिरी आणि डेटा चोरीचा आरोप केला. ज्यानंतर आता अमेरिकेनेही टीकटॉकवर बंदी घातली आहे.

 अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायलाच हवा… जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

दरम्यान, वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनच्या आणखी हालचाली उघडकीस आल्या आहेत. डिसएंगेजमेंटनंतरही चीन पँगोंग लेकमध्ये आपल्या सैनिकांची तैनात वाढवत आहे. १४ जुलै रोजी झालेल्या चर्चेनंतर चीनने पँगोंगमध्ये अतिरिक्त बोटी आणि सैन्य तैनात केले आहे. या वादग्रस्त भागात चीन आपली ताकद वाढवत आहे. पँगोंग लेकमध्ये चीनने नवीन कॅम्प बांधण्यास सुरुवात केली आहे. या कॅम्पमध्ये अतिरिक्त सैन्याच्या तुकड्या तैनात केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, पँगोग लेकमध्ये आणखी बोटी उतरविल्या जात आहेत.