जनतेच्या शक्तीमुळेच सरकार झुकले; अण्णा हजारेंचे राळेगणमध्ये जल्लोषात स्वागत

स्वप्नील भालेराव/ पारनेर:  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आज राळेगणसिद्धीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलंं आहे. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर मागील पाच दिवसांपासून अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीने  केंद्र सरकारने अण्णांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर अण्णांनी आपले उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली होती. आज त्याचं राळेगणसिद्धीमध्ये आगमन झाल आहे.

यावेळी बोलताना आण्णा हजारे म्हणाले कि, ‘ जनतेच्या रेट्यामुळेच केंद्र सरकार झुकल असून सरकारने मागण्या मान्य केल्याने देशातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने आपल्याला याबद्दल लिहून दिल असून आपण शेतकऱ्यांच्या शेतमालाला ५० टक्के भाव वाढवून देणार असल्याच सांगितल आहे’

आज दुपारी  अण्णा हजारे यांचे रामलिलावरील उपोषण संपवून राळेगणसिद्धी मध्ये आगमन होताच ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोशात फटाके फोडत व गुलाला मुक्त  उधळन  करत. पेढे वाटून आंनदोत्सव साजरा केला  यावेळी यादवबाबा मंदिरामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .या वेळी अण्णा हजारे यांनी संत यादव बाबांचेचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला

 

You might also like
Comments
Loading...