पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांच्यानंतर आता आमदार रवी राणा यांना देखील कोरोना संसर्ग

navneet rana

अमरावती: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचा कोरोना अहवाल दुपार पॉझिटिव्ह आला होता. तर, यानंतर त्यांचे पती व आमदार रवी राणा यांचा प्रतीक्षेत असलेला अहवाल देखील पॉझिटिव्ह येणार असा अंदाज बांधला जात होता. खासदार नवनीत राणा यांच्यासह कुटुंबियांच्या संपर्कात असल्याने आता रवी राणा यांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजत आहे.

चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या, तर गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : दूध भुकटी मुलं,महिलांना मोफत देणार राज्यसरकार

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता त्यांच्या कुटुंबातील एकूण १२ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं अहवाल आल्यानंतर स्पष्ट झालं आहे. या सदस्यांमध्ये राणांच्या मुलांचाही समावेश आहे. त्यातच, आज आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार – गुलाबराव पाटील

नवनीत राणा यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतः फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली होती,  ‘माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते.मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा ,शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे’.

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री

तर, बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांचे वडील आणि खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट कालच पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत आता राणा दाम्पत्यासह एकूण १२ जणांना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.