पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी होतेयं सोशल मीडियावर ट्रोल

shetty

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फ्रेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

फेब्रुवारी २०२१मध्ये राज कुंद्रा विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. अश्लिल व्हिडीओ चित्रीत करुन तो समाजमाध्यमावर प्रसिद्ध करण्याचा प्रकार समोर आला होता. याच प्रकरणात प्राथमीक तपासणीत राज कुंद्रा यांचे नाव समोर आले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती पुरवे लागल्यानंतर त्यांनी राज कुंद्रा यांना अटक केली. राज कुंद्राच्या अटकेने उद्योगजगत आणि मनोरंजन क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली आहे.

राजच्या या कृत्यामुळे त्याचे आणि कुटुंब अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर राज कुंद्रा प्रकरण तुफान तापलं आहे. सोशल मीडियावर कुंद्रा  पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सतत प्रश्न विचारले जात आहेत. ‘पतीच्या कृत्याबद्दल तुला काही माहिती नव्हतं का?’ असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP