अकोला : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या राज्यसभा उमेदवारी चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र अनिल बोंडे यांना उमेदवारी दिल्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“पवारसाहेबांवर नीच पातळीवर टीका करणाऱ्या, हातावर हात देऊन बसाल तर तुमच्या लेकीबाळींवर हिजाब घालण्याची वेळ येईल, अधिकाऱ्याला फटके मारा ,नाना पटोले यांचा पंजा छाटला जाईल,अशी मुक्ता फळे उधळणाऱ्या व तहसीलदारांना मारहाण केल्यामुळे शिक्षा झालेल्या अनिल बोंडे यांना चक्क राज्य सभा?”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. सोबतच त्यांनी भाजपबदलरहाहे हा हॅशटॅगही वापरला आहे.
पवारसाहेबांवर नीच पातळीवर टीका करणाऱ्या, हातावर हात देऊन बसाल तर तुमच्या लेकीबाळींवर हिजाब घालण्याची वेळ येईल, अधिकाऱ्याला फटके मारा ,नाना पटोले यांचा पंजा छाटला जाईल,अशी मुक्ता फळे उधळणाऱ्या व तहसीलदारांना मारहाण केल्यामुळे शिक्षा झालेल्या बोंडेना चक्क राज्य सभा? #भाजपबदलरहाहै.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 29, 2022
दरम्यान भाजपने दुसऱ्या जागेसाठी अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. बोंडे हे २००९ मध्ये अपक्ष तर २०१४ मध्ये भाजपच्या वतीने विधानसभेवर निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- संजय राऊतांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तर घोडेबाजाराचा…”
- “उद्धव ठाकरे यांची सभा भव्य आणि विराट होणार” ; चंद्रकांत खैरेंचा विश्वास
- हार्दिक पटेल भाजपात जाणार?; स्पष्टीकरण देत म्हणाले…
- IPL 2022 Final : गुजरात टायटन्स मालामाल; राजस्थान आणि लखनऊ संघालाही मिळालं ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस!
- IPL 2022 : “लोकांना हार्दिक पंड्या का आवडतो…?” वीरेंद्र सेहवागनं सांगितली ‘ही’ बाब, काय म्हणाला? वाचा!