लीलावतीतून थेट विधानसभेत ; गोव्याचा अर्थसंकल्प पर्रिकरच मांडणार

टीम महाराष्ट्र देशा: स्वादुपिंडाला सूज आल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते गोव्यात दाखल झाले आहेत. आज सादर होणारा गोव्याचा अर्थसंकल्प ते स्वत: विधानसभेत मांडणार आहेत.

स्वादुपिंडाला सूज आल्याने पर्रिकरांवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या अनुपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची विधानसभेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मुख्यमंत्रीपदासोबत गोव्याच्या अर्थखात्याचा कार्यभारही पर्रिकरच सांभाळत आहेत. रुग्णालयातूनच त्यांनी बजेटच्या कामावर आणि अर्थसंकल्पीय भाषणावर अखेरचा हातही फिरवला होता.

You might also like
Comments
Loading...