फक्त बोलणार नाही तर आता रस्त्यावर सुद्धा उतरणार ; छगन भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल

पुणे : आज हल्लाबोल सभेतून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. वाघ म्हातारा झाला म्हणून काही गवत खात नाही. असे त्यांनी ठासून सांगितले. तुरुंगातून सुटल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलत होते. पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल सभेची सांगता आणि पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीने आज पुण्यात भव्य हल्लाबोल सभा घेतली.

छगन भुजबळ म्हणाले, आदरणीय न्याय देवेतेमुळे मी आज तुमच्या समोर बोलत आहे. न्याय देवतेवर विश्वास आहे, यापुढे सुद्धा लढून निर्दोष सुटेल, असा विश्वास आहे. तुरूगातून बाहेर आल्यानंतर खायचं काय? असा प्रश्न पडला, पाहिलं तर सर्व कुटुंबाच्या खात्यात 15-15 लाख जमा. असे बोलून भुजबळांनी नरेंद्र मोदी यांच्या घोषणेची खिल्ली उडवली.

Loading...

केंद्र सरकारवर टीका करतांना भुजबळ म्हणाले, लोकं घोडे घ्यायला लागले. पेट्रोल परवडत नाही. गाड्या सोडून घोड्याला भाव आला. सर्वांना नोकरी,घराघरात स्वस्त गॅस दिल्यामुळे केंद्र सरकारचे आभार. गेल्या चार वर्षात देशात एकही अत्याचार झाला नाही, सर्वत्र शांतता, नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला. स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडियानंतर रुईनअप इंडिया येतंय असं वाटत आहे. देशात चार स्मार्ट सिटी दाखवा, चार जिल्हे दाखवा जे पूर्ण प्रकाशमान आहेत,ज्यांच्यातील जनधन खाती जीवंत आहेत. असा रोखठोक हल्लाबोल छगन भुजबळ यांनी सत्ताधारी पक्षावर केला.

केवढे चांगले दिवस, शेतकरी आत्महत्या करत नाही, हमीभाव मिळतोय. आता गावात आत्महत्या होत नाही, मंत्रालयासमोर होतात. शेतकऱ्यावर कमी भावासाठी जबरदस्ती, शेतकरी रडताएत, पाकिस्तानची साखर आता यांना गोड लागते. असे बोलून भुजबळांनी भाजपच्या ‘अच्छे दिन’वर टीका केली.

आरक्षणा संदर्भात बोलतांना भुजबळ म्हणाले, “माझं पूर्ण समर्थन, पाठिंबा मराठा आरक्षणाला होता. कुणीही सांगावं मी विरोध केला. इंदिराजींची आणीबाणी घटनेवर आधारीत होती, आताची आणीबाणी मात्र भीषण आहे. मराठा समाजाने समजून घ्यावं, तो मोठा भाऊ आहे. १७ टक्के आरक्षण उरलंय आणि ४०० जाती आहेत, कसं द्यायचं आरक्षण? आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली राष्ट्रवादी कशी सोडेल ?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

भुजबळ पुढे म्हणाले, “कुणी वाघ म्हणतंय, कुणी माकड म्हणतंय, बंदर उछलना तो छोडेगा नही. माझ्या सुटकेसाठी मोर्चे काढण्यात आले, मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचा कंत्राटदारही मी नेमला नाही. म्हैस होती पाच फुटांची गाभण, आणि रेडकू निघालं 15 फुटांचं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. माझं सगळं जप्त केले पण लोकांचं प्रेम नाही जप्त करू शकत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात