‘याचिका दाखल केल्यानंतर शाळांच्या ‘फी’ वाढीसंदर्भात ठाकरे सरकारला जाग’

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शाळांच्या शुल्क वाढीसंदर्भात ठाकरे सरकारच्या वतीने शाळांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर ठाकरे सरकारला जाग आली असल्याचा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. या संदर्भात आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. तसेच ठाकरे सरकारच्या कारभारावरही त्यांनी टीका केली. त्यांनी लिहिले की, ‘कोरोना काळात शाळांच्या अवास्तव फी वाढी विरोधात मी हायकोर्टात दाखल केलेल्या PIL नंतर ठाकरे सरकारला जाग आलेली दिसते. हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत झाल्यानंतर फी अभावी शाळा बंद करू नका असा सारवासारव करणारा आदेश शाळांसाठी काढण्यात आलाय,पूर्ण न्याय होईपर्यत हा संघर्ष सुरू राहील.’

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यात सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शाळा तसेच महाविद्यालांचे शुल्क माफ करा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, तरीही अनेक शाळांनी अवाजवी शुल्क वसूल केले. त्यामुळे पालक नाराज आहेत. या संदर्भात आता ठाकरे सरकारने शाळांना पत्र पाठवले आहे. मात्र, याचिका दाखल केल्यानंतर ठाकरे सरकारला जाग आली असल्याची टीका भाजपकडून होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP