‘फॅन’ नंतर पुन्हा एकदा शाहरुख दिसणार दुहेरी भूमिकेत

shahrukh khan

मुंबई : झिरो नंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर बॉलीवूड किंग खानचा एक नवीन सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला. या सिनेमाबद्दल अजूनतरी कोणतीही ऑफिशिअल बातमी समोर आली नाही. पण बॉलीवूड किंग खान लवकरच राजकुमार हिरानी, सिद्धार्थ आनंद, एटली कुमार आणि राज एंड डीके यांच्यासोबत काम करताना दिसणार आहेत.

राजकुमार हिरानींसोबत कॉमेडी ड्रामा तर सिद्धार्थ आनंद सोबत एक्शन ड्रामा फ़िल्म व साउथ दिग्दर्शक एटली कुमार सोबत एक कमर्शियल एंटरटेनर, चित्रपट करणार आहे. याबाबत माहिती अशी की बॉलीवूड किंग खान पुन्हा एकदा आपल्या दुहेरी भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

एटली कुमार यांची फिल्म करण जोहर प्रोड्युस करत आहेत. एटली कुमार यांच्या सिनेमाच्या आधी राजकुमार हिरानी यांची ‘पठान’ ह्या फिल्मची शूटिंग सुरु करणार आहे. या सिनेमामध्ये किंग खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम खास भूमिकेत दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-