भाजप प्रवेशानंतर पहिल्यादाचं उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले एकत्र

blank

टीम महाराष्ट्र देशा:-भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची साताऱ्यात बैठक झाली. दोन्ही राज्यांच्या नात्याला नवं वळण मिळतंय की काय अशी घटना दोघांच्या भेटीच्या निमित्ताने समोर आली आहे. या भेटीनंतर दोन्ही राजांमधील वाद मिटला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. या भेटीत विविध मुद्यांवर चर्चा झालायचं कळतंय. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातारणात बदल होताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्ध्या तासात माझ्या मतदारसंघातील सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. ३७० सारखं कलम रद्द करून त्यांनी देशात एक नवा संदेश दिला आहे. असं सांगत शिवेंद्रसिंहराजे यांनी स्तुतिसुमनं उधळली आहेत. मी लोकसभेसाठी इच्छुक नसून मला राज्यात काम करायचं आहे, असंही शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान राष्ट्रवादीत असताना उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद टोकाला गेला होता. याच वादातून शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कार्यकर्त्यांच्या शब्दाखातर काही गोष्ठी कराव्या लागतात.कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यावर त्या क्षणी काही गोष्टी घडतात, मात्र मी कोणाचं सांगून काहीतरी करत नाही. मी दुसरं कोणाच्या सांगण्यावरून काही करत नाही. आम्ही दोघेही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे.