शनिवारवाड्यात ‘एल्गार’ नंतर आता ‘सावधान परिषद’

jnu11

पुणे : शिनिवार वाड्यात नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेनंतर येत्या २८ जानेवारीला शनिवारवाड्यावर सावधान परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सावधान परिषेदेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता कनैह्या कुमार ची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

नुकत्याच कोरेगाव भीमा यथे झालेल्या हिंसाचारामुळे शनिवारवाडा केंद्रस्थानी समजल्या जात होता. तर अनेक सामाजिक संघटनांनी शनिवार वाड्यावरील एल्गार परिषेदेला विरोध देखील केला होता. कोरेगाव भीमाचे पडसाद अवघ्या राज्यात उमटले दरम्यान मातंग समाजातील विविध संघटनांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. बैठकीत जातीयवादी व धर्मांध शक्तीविरोधी लढण्यासाठी मातंग समाजाने एकत्र येण्याचे ठरले आहे. मातंग समाजाला जागृत करण्यासाठी सावधान परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, सावधान परिषेदेला संपूर्ण राज्यातून १० हजाराच्या वर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बेरोजगारीच्या प्रश्नांऐवजी राज्य सरकार समृद्धी मार्ग आणि धरणांवर चर्चा करत आहे. मात्र त्यातून विस्थापित शेतकऱ्यांवर मात्र चर्चा करत नाही. विचारांपेक्षा जातीला महत्त्व प्राप्त झाले असून, हे समाजाच्या विकासासाठी मारक ठरत आहे. त्यामुळे या परिषेदेला समविचारी संघटनांना सोबत घेतले जाणार असून कन्हैया कुमारच्या उपस्थितीत या परिषदेत धर्मांध शक्तीविरोधी लढा उभारण्यासाठी बहुजन समाजाचा कृती आराखडा तयार केला जाईल. तसेच या परिषेदेला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रवीण गायकवाड,भारत पाटणकर उपस्थित राहणार आहेत.