सोलापूर / आळंद : मतदारांचे हात-पाय बांधून भाजपला मतदान करायला आणा या येडीयुरप्पा यांच्या वक्तव्याचा वाद सुरु असताना आता मुख्यमंत्री झाल्यानंतर जाहीरनाम्याप्रमाणे विकास योजना राबविण्याबरोबरच कॉंग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करून त्यांना कोठे ठेवायचे ते ठरवू असा थेट भाजपचे कर्नाटक राज्याध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी इशारा दिला आहे .सोमवारी दुपारी आळंदच्या श्रीराम मार्केट मैदानावर आयोजित सुभाष गुत्तेदार या भाजपच्या निवडणूक प्रचार सभेत कॉंग्रेसवर सडकून टीका केली.
नेमकं काय म्हणाले येडीयुरप्पा
येत्या १२ मे रोजीच्या मतदानानंतर कर्नाटकात भाजपचे सरकार येणार व मी मुख्यमंत्री म्हणून १८ मे रोजी शपथविधी घेणारच . मुख्यमंत्री झाल्यानंतर जाहीरनाम्याप्रमाणे विकास योजना राबविण्याबरोबरच कॉंग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करून त्यांना कोठे ठेवायचे ते ठरवू गेल्या पाच वर्षात कर्नाटकातील सिध्दरामय्या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून निवडणुक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जनमत भाजपच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत असून येत्या पाच दिवसात सिध्दरामय्यांच्या सरकारचे पतन होईल व त्यायोगे सिध्दरामय्यांच्या नेतृत्वाखालीच कॉंग्रेसचा सर्वनाश होईल असे भाकीत यडीयूरप्पांनी व्यक्त केले.
Add Comment