पप्पू ऐवजी युवराज ;गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा व्हिडिओ

BJP

टीम महाराष्ट्र देशा – निवडणूक प्रचारासाठी भाजपने तयार केलेल्या व्हिडिओमध्ये ‘पप्पू’ शब्दाचा वापर करण्यात आला होता. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. एका खास व्यक्तिमत्वाकडे इशारा करत ‘पप्पू’ शब्दाचा अपमानजनक वापर केला जात असल्याचे निवडणूक आयोगाने भाजपच्या प्रचार साहित्याचे परीक्षण केल्यानंतर म्हटले होते. त्यानंतर ‘पप्पू’ शब्द वगळून त्याऐवजी ‘युवराज’ शब्द वापरला आहे

मंगळवारी भाजपने निवडणूक प्रचारासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये अभिनेते मनोज जोशी एका पुस्तक स्टॉलचालकाच्या भूमिकेत दिसत आहेत. या व्हिडिओमधून ‘पप्पू’ शब्दाचा वापर करुन राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला होता. मात्र निवडणूक आयोगाने ‘पप्पू’ शब्दावर आक्षेप घेतल्यावर आता त्याजागी ‘युवराज’ शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजपच्या जाहिरातीत ‘पक्षाचे युवराज अतिशय उत्तम विनोदी नट आहेत. त्यांच्यापुढे व्यावयायिक विनोदी नटांचाही निभाव लागणार नाही. लोकांना प्रश्नांची उत्तरे हवी असतात. मात्र यांना उत्तरांना प्रश्न हवे असतात,’ असे वाक्य वापरण्यात आले आहे.