सई ताम्हणकर पुन्हा पडली प्रेमात

सई ताम्हणकरचा पतीसोबत घटस्फोट होऊन दीड वर्षं झाले असून ती पुन्हा प्रेमात पडली असल्याचे तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे.

टीम महाराष्ट्र देशा : सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ ला झाले होते. अमेय हा देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित असून तो एक प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधी एकत्र काम केले नाही. सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह केला होता. तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते.

सईने २०१८ या वर्षाची सुरुवात एकदम जोरदार केली आहे. तेजस नेरुळकरकडून तिने फोटो शूट करून घेतले असून या फोटोशूटमधील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सईचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. सईच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. या फोटोला अनेकांना लाइक केले असून तिच्या फॅन्सने या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या होत्या.
 एका मुलाखतीत तिने ती पुन्हा प्रेमात पडली असल्याचे देखील सांगितले आहे. या तिच्या मुलाखतीची चांगलीच चर्चा होत आहे. या तिच्या मुलाखतीमुळेच तिचा घटस्फोट झाला असल्याचे तिच्या फॅन्सना कळले आहे. अमेय आणि सईचे खूपच चांगले पटत होते. त्यांनी अनेकवेळा प्रसारमाध्यमांना एकत्र मुलाखतीदेखील दिल्या आहेत. तिने या मुलाखतींच्या दरम्यान अमेय तिला तिच्या प्रोफेशनमध्ये प्रचंड सर्पोट करत असल्याचे सांगितले होते.

अमेय आणि सईने लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय, मित्रमैत्रीण चांगलेच खूश झाले होते. त्या दोघांनी ७ एप्रिल २०१२ला साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर ते दोघे लगेचच लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. पण सई कामात व्यग्र असल्याने तिने एक वर्षं लग्न पुढे ढकलले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

You might also like
Comments
Loading...