पुणे – देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यात काही ठिकाणी वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोकण्यासाठी शासनाने काही निर्बंध लादले असून यामुळे व्यापारी वर्ग चांगलाच नाराज झाल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळाले होते.पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाविरोधात शहरातील व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
कोरोना निर्बंधामुळे आक्रमक झालेल्या पुण्यातील व्यापाऱ्यांनी आज दुकाने उघडण्याची घोषणा केली होती यामुळे काहीअंशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता व्यापारी महासंघाने पुण्यातील नियोजित आंदोलन स्थगित केले आहे. आम्ही आता सोमवारपासून दुकाने उघडू, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.
दरम्यान,महाराष्ट्रात काल 2 लाख 36 हजार 815 कोरोना चाचण्या झाल्या त्यात 56 हजार 286 नवीन कोरोनाबाधित आढळले चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण 23 पुर्णांक 76 शतांश टक्के आहे. आतापर्यंतच्या एकंदर बाधितांची संख्या आता 32 लाख 29 हजार 547 झाली आहे. दैनंदिन बाधितांची संख्या कमी होण्याची चिन्हं दिसत नसली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढते आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- क्रिकेटच्या देवाने कोरोनाला हरवलं; सचिनला रुग्णालयातून डिस्चार्ज
- लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना म्हणावे लागले, ‘…तो मी नव्हे’
- वाझे शिवसेनेचा माणूस असून सरकारवर आरोप करतो म्हणजे ते सत्य असेल – आठवले
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीला बोलावून आमची फसवणूक केली
- ‘भिडेंनी वैज्ञानिक, डॉक्टरांचा अपमान केलाय,त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा’