धवन, भुवनेश्वरच्या पाठोपाठ भारताचा ‘हा’ खेळाडूही जखमी

टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या विश्वचषक मोहिमेला ग्रहण लागल्याच दिसत आहे. कारण भारताचा तिसरा खेळाडू विजय शंकर याला देखील दुखापत झाल्याच वृत्त आल आहे. पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार,नेट प्रॅक्टिस दरम्यान बुमराहच्या गोलंदाजीवर विजय शंकरला दुखापत झाली आहे.

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ एका बाजूला दमदार कामगिरी करत असताना दुसऱ्या बाजूने दुखापतीचा माऱ्याने संघाच्या अडचणी वाढत आहेत. सलामीवीर शिखर धवनने दुखापतीनंतर स्पर्धेला मुकावे लागल्यानंतर भुवनेवर कुमार दोन सामन्याला मुकणार असल्याचे वृत्त धडकले. त्यात आता आणखी एका वृत्ताची भर पडली आहे.

Loading...

मात्र ही दुखापत गंभीर नसल्याचं भारतीय संघांकडून सांगण्यात येत आहे. विजय शंकर हा भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाचा उत्तम पर्याय आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवली नसली तरी गोलंदाजीत त्याने कमालीची कामगिरी दाखवली होती. या सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय संघाला पहिले यश त्यानेच मिळवून दिले होते.

दरम्यान याआधीचं भारतीय संघाला दोन धक्के सहन करावे लागले आहेत. भारताचा सलामीचा खेळाडू शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना गंभीर दुखापत झाली आहे. शिखर धवन याला झालेली दुखापत ही लवकर रिकव्हर होणारी नसल्याने त्याला विश्वचषकाला मुकावे लागले आहे. तर भुवनेश्वर कुमार याला दोन सामन्यातून वगळण्यात आले आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी