कृणाल पांड्या कोरोनावर मात करून परतला मायदेशी ‘हे’ दोन खेळाडू श्रीलंकेतच

team india

मुंबई : श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी गेलेला भारतीय अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्याआधीच कोरोना संक्रमित आढळला होता. यानंतर त्याला श्रीलंकेत अनिवार्य क्वारंटाईन प्रक्रियेतून जावे लागले आणि आता त्याने कोरोनावर मात करून घरी परतला आहे. कृणाल नंतर युझवेंद्र चहल आणि कृष्णाप्पा गौतम हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

फिरकी अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या श्रीलंकेतील क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून अखेर भारतात परतला आहे. श्रीलंका दौऱ्याच्या समाप्तीनंतर इतर भारतीय खेळाडू भारतात परतले, पण कृणाल आणि चहल यांना श्रीलंकेतच राहावे लागले. तथापि, युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम श्रीलंकेत आहेत आणि त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. क्रिकेटरने अनिवार्य सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आणि दरम्यान दोन आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट द्यावे लागले. कृणाल पंड्या 5 ऑगस्ट गुरुवारी दुपारी मुंबई विमानतळावर पोहचला.

आता युझवेंद्र चहल आणि कृष्णाप्पा गौतम हे दोनच खेळाडू श्रीलंकेत आहेत, तर पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यापूर्वीच यूकेला गेले आहेत. गुरुवारी चहल आणि गौतम आरटी-पीसीआर चाचणी घेऊ शकतात आणि त्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर ते शुक्रवारी किंवा शनिवारी भारतात परत येऊ शकतात. कृणाल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 8 खेळाडूंना अलग ठेवण्यात आले, जे पांड्याच्या संपर्कात आले. त्यापैकी केवळ दोन खेळाडूंना संसर्ग आढळला.

महत्त्वाच्या बातम्या