fbpx

संविधान, लोकशाही आणि सैन्यदलानंतर संघानेच भारतातील लोकांना सुरक्षित ठेवलं

Justice-K-T-Thomas

टीम महाराष्ट्र देशा- आणीबाणीपासून सुटका करण्याचे श्रेय जर एका संस्थेला द्यावयाचे झाले तर ते आरएसएसला मी देईन तसेच संविधान, लोकशाही आणि सैन्यदलानंतर संघानेच भारतातील लोकांना सुरक्षित ठेवल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.टी.थॉमस यांनी व्यक्त केले आहे. ३१ डिसेंबर रोजी केरळमधील कोट्टयम येथे आरएसएसच्या प्रशिक्षण शिबिरात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.न्यायमूर्ती के.टी.थॉमस यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

rss
file photo

काय म्हणाले के.टी.थॉमस?

जर मला कोणी विचारले की, भारतात लोक सुरक्षित आहेत का?, तर मी सांगेन की, देशात एक संविधान आहे, लोकशाही आहे, सैन्यदल आहे आणि चौथा आरएसएस आहे. आणीबाणीविरोधात आरएसएसच्या मजबूत आणि संघटीत कार्याची चाहूल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही लागली होती. त्यांना तेव्हाच समजले होते की, आणीबाणीचे प्रकरण जास्त दिवस चालू शकणार नाही. साप विषाचा उपयोग आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याविरोधात हत्यार म्हणून करतात. पण मानवाची शक्ती एखाद्यावर हल्ला करण्यासाठी तयार केलेली नाही. शारीरिक शक्तिचा अर्थ हल्ल्यांपासून स्वत:ला वाचवणे असा आहे. असे सांगण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मी आरएसएसचे कौतुक करतो. आरएसएसचे शारीरिक प्रशिक्षण हे एखाद्या हल्ल्यावेळी देश आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी असते, असे मला वाटते.

2 Comments

Click here to post a comment