आधार कार्ड डेटा पूर्ण सुरक्षित असल्याचा सरकारचा दावा; मात्र ट्रायच्या अध्यक्षांचाच डेटा झाला लीक

नवी दिल्ली : आधार कार्डचा डेटा खरचं सुक्षित आहे का? या बाबतच्या चर्चेला उधाण आले आहे . आधार कार्ड काढण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या वयक्तिक माहिती बाबतही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र आपला आधार डेटा सुरक्षित असल्याचं वारंवार सरकारकडून सांगण्यात आहे. मात्र आता सरकारच्या या दाव्यातील फोलपणा उघडकीस आलाय. खुद्द भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांच्या आधार कार्डवरून त्यांच्याबाबतची गोपनीय माहिती एका ट्विटर यूजरने उघड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आधार कार्ड डेटा सुरक्षिततेच्या चर्चेदरम्यान ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी ट्विटरवर आपला आधार कार्ड क्रमांक शेअर केला आणि युजर्संना आव्हान दिले की, नुकसान किंवा हानी पोहोचेल, अशी कोणतीही माहिती शोधून दाखवावी. शर्मा यांचे आव्हान एलियट एल्डर्सन नावाच्या युजरनं स्वीकारलं. केवळ स्वीकारलंच नाही तर पूर्णदेखील केले.

एलियट एल्डर्सननं शर्मा यांचा पत्ता, आधार कार्डसोबत जोडण्यात आलेला मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, जन्मदिनांक आणि त्यांचे व्हॉट्सअॅपवरील फोटोदेखील सार्वजनिक केले. आव्हान पूर्ण केल्यानंतर एलियट एल्डर्सननं म्हटले की, आपण आधार कार्ड योजनेविरोधात नाही. मात्र आधार क्रमांक सार्वजनिक करणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो.

शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश