पुण्यात ‘दशक्रिया’ला नो स्क्रीन ? सिटीप्राईड सह अन्य चित्रपटगृहांचा सिनेमा दाखवण्यास नकार

पुणे: जेष्ठ लेखक बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित ‘दशक्रिया’ सिनेमाला होणारा ब्राम्हण संघटनांचा वाढता विरोध पाहता पुण्यातील काही चित्रपटगृहांनी हा सिनेमा दाखवण्यास नकार दिला आहे. यामध्ये सिटीप्राईड, किबे लक्ष्मी थियेटर. फन टाईम यासारख्या प्रमुख मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांचा समावेश आहे. या सिनेमात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकढून करण्यात आला आहे

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील अनेक थिएटर आणि मल्टिप्लेक्सना भेटी दिल्या होत्या. यावेळी ‘दशक्रिया’ सिनेमा न दाखवण्याची विनंती त्यांनी मल्टिप्लेक्सच्या मालकांना केली होती दरम्यान बुक माय शो तसेच इतर अॅडवांन्स बुकिंग सिटी प्राईड कोथरुडकडून बंद करण्यात आलं आहे.

 

.