बाइडन सत्तेवर येताच ‘जागतिक आरोग्य संघटना’; पॅरिस हवामान करारातही अमेरिकेचा पुन्हा सहभाग !

bayden

वाशिंग्टन: जगातील महासत्ता म्हणून अमेरिका नेहमीच अनेक संघटनांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करत असते. तर महासत्ता म्हणून अमेरिकेचे काही कर्तव्य देखील असतात. मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा संघटनांमधील आपला सहभाग काढून घेतल्याचा देखील दिसून आला आहे. यामध्ये पॅरिस हवामान करार आणि जागतिक आरोग्य संघटना या दोन महत्त्वपूर्ण संघटनांमधून अमेरिकेने आपला सहभाग काढून घेतला होता.

कोरोना काळामध्ये चीनकडून जगाला भेटीस धरण्याचं काम होत आहे. त्याचबरोबर कोरोना हा विषाणू चायनीज विषाणू असल्याचे देखील संबोधलं होतं. कोरोना साथ वाईट पद्धतीने हाताळून चीनच्या हातचे बाहुले बनल्याची टीका करत ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली व त्यांचा निधीही बंद केला होता.

मात्र नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकांमध्ये जनतेने डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बाईडन यांना निवडून दिले आणि सत्ता हाती घेताच पहिल्या दिवसापासून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेत परत सामील होऊ असे सांगून ते म्हणाले, की पॅरिस हवामान करारातही आम्ही पुन्हा सहभागी होऊ. जगातील इतर देश व अमेरिका मिळून काही सीमारेषा स्पष्ट करणे गरजेचे आहे, ज्या चीनला समजतील असे त्यांनी म्हटले आहे.

बायडेन यांनी गुरुवारी सांगितले, की चीनने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय चर्चेत बायडेन यांनी चीनला शिक्षा करण्याचे वक्तव्य केले होते पण त्यावर खुलासा करताना त्यांनी आता असे म्हटले आहे,  चीनने संघटनेच्या नियमांचे पालन करावे एवढेच आमचे म्हणणे आहे. चीनने आंतरराष्ट्रीय नियमाधिष्ठित व्यवस्थेचे पालन करावे, असे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले असून जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका पुन्हा सहभागी होईल, असे स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या