उद्धव ठाकरे अयोध्येनंतर आता पंढरपुरातही करणार महाआरती

Uddhav_Thackray

मुंबई – अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेली शिवसेना आता 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. शरयूनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत.

अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून आता 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. शरयूनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रभागेच्यातीरावर महाआरती करणार आहेत. यानंतर ते विठ्ठल मंदिराचे दर्शन घेऊन अयोध्येत राम मंदिर बांधण्याची सुबुद्धी सरकारला द्या, असे साकडे घालणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी, मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या ‘विठाई’ या नवीन एसटीसेवेचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या सभेसाठी शिवसैनिकांसह राज्यभरातील वारकरी हजर राहणार आहे.

राम मंदिराचा मुद्दा आणखी प्रखार्षाने समोर येण्यासाठी शिवसेनेने 24 डिसेंबरला पंढरपुरात सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्री आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.Loading…
Loading...