पोलीस ठाण्यात हजेरी लावल्यावर नारायण राणे म्हणाले, ‘अलिबागचे जेवण चांगले होते!’

रायगड : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबाबत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार राणे यांनी आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावली. नारायण राणे हे गेट ऑफ इंडियावरून स्पीड बोटीने अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले होते. दुपारी ठिक आडीच वाजता ते पोहोचले. अवघ्या १५ मिनिटांतच पोलिसांनी त्यांची हजेरी घेत जबाब नोंदवला.

पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर तेथून परतत असताना राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मी पोलीस स्टेशनला आलो. न्यायालयाने जो आदेश दिला होता, त्याचे पालन करून आलो आहे. आदेशाप्रमाणे कोणताही जबाब नोंदवला नाही. रायगड पोलिसांनी सहकार्य केले. अलिबागचे जेवण सुद्धा चांगले होते’, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.

 

शिवाय राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, ‘मागच्या वेळी येणे शक्य नव्हते त्याचे कारण लेखी स्वरूपात दिले होते. राणे यांचा जबाब नोंदवला आहे, त्यांची जी चौकशी करायची होती ती त्यांनी केली. आम्ही पोलिसांना सर्व सहकार्य करू. व्हॉइस सॅम्पल आज घेतले नाही. पुढची तारीख काही सांगितली नसल्याचे देसाई म्हणाले.

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन राणे यांना महाड पोलिसांनी जेवन करत असतानाचा अटक केली होती. तो जेवनाचा मुद्दा चांगलाच चर्चिला गेला होता. दरम्यान, कोर्टाने काही अटी, शर्तीवर जामिन राणेंना मंजूर केला होता. ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर अशा दोन दिवस राणे यांनी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी लावावी असे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र, ३० तारखेला तब्येत ठिक नसल्याचा अर्ज राणे यांनी देत गैरहजर राहिले होते.

महत्वाच्या बातम्या :