fbpx

अमितच्या लग्नानंतर राज ठाकरे ‘या’ लग्नांत व्यस्त

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले अनेक नेते निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लग्नसराई मध्ये व्यस्त असताना दिसत आहेत. कारण मनसेच्या अधिकृत ट्वीटर अकाउंट वरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित पालघर जिल्यातील ग्रामीण दुर्गम भागातील गरीब , शेतकरी , मजदूर , आदिवासी समाजातील ५०० जोडप्यांच्या सामुहिक विवाहाची पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. या विवाह सोहळ्यात स्वतः राज ठाकरे व शर्मिला ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

नुकताच अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यातून मोकळे होताच राज ठाकरे यांनी पालघर जिल्यामधील गरीब , शेतकरी , मजदूर आणि आदिवासी समाजातील ५०० जोडप्यांच्या सामुहिक विवाहाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या निवडणुकींच्या चर्चेत तसे कमीच दिसत आहेत.