पुण्यातल्या ‘फर्ग्युसन महाविद्यालया’त जवळजवळ १३५ वर्षा नंतर जल्लोषात ‘शिवजयंती’

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील नामवंत अशा फर्ग्युसन महाविद्यालयात जवळजवळ १३५ वर्षा नंतर पहिल्यांदाच अगदी जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. जयंती साजरी करण्यास महाविद्यालय प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे, पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भव्य शिवजयंतीचे आयोजन महाविद्यालयात केले गेले.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. यावेळी महाविद्यालयामध्ये पालखी सोहळ्याचे सुद्धा आयोजन केले गेले होते.

या सोहळ्यात मावळ्यांच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी, पारंपरिक वाद्य व शिवकालीन मर्दानी खेळ पथक प्रमुख आकर्षण असलेल्या या पालखी सोहळ्यात हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सोहळ्याची सांगता शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे याच्या शाहिरीच्या कार्यक्रमाने झाली.

Loading...

यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे,महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्रसिह परदेशी व उद्योजक महेश करपे आदी उपस्थित होते. या अशा भव्य मिरवणुकीचे नियोजन कॉलेज मधील काही मुलांनी केले होते. त्यात दिनेश महाजन , प्रतीक झगडे , अमन परदेशी , आकाश जाधव ,शिवम टिळेकर, सत्यजीत मोहिते , राधिका पुरोहित , मोहित चव्हाण,प्रणव कुलकर्णी, पवन ,वेदांत बोडके, अभिषेक, अर्पित,वैभव,आकाश आदींचा समावेश होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश