अखेर बाबासाहेबांचा भगवा पुतळा झाला निळा !

babasaheb ambedkar

दुगरैया: उत्तर प्रदेश सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात बदल केल्यानंतर त्यांच्या भगव्या पुतळ्याचा वाद निर्माण झाला होता. दुगरैय्या गावात आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तिथं बाबासाहेबांचा चक्क भगव्या रंगातला पुतळा बसवला होता. त्यानंतर बसपाच्या नेत्यांनी पुतळ्याला निळा रंग दिला आहे.

देशभरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे प्रकार सुरु आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सध्या बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून राजकारण तापले आहे. अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर राज्य सरकारने बी आर आंबेडकर ऐवजी भीमराव रामजी आंबेडकर असे पूर्ण नाव लिहिण्याच्या सूचना केली होती. त्यानंतर आता पुतळ्याचा रंगच बदलण्यात आल्याने आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.