अखेर गणेश मंडळानेच रस्त्यातले खड्डे बुजविण्याचे काम घेतले हाती !

potholes in the road

औरंगाबाद : पैठण शहरातील प्रथम मानाचा कापड मंडई गणेश मंडळाने यंदा शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते व नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे, अजित पगारे , चेअरमन निमेश पटेल, इरफान बागवान, जालिंदर अडसुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी पो.नि.गीरी म्हणाले की, कापड मंडई गणेश मंडळाने हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. गेली 76 वर्षांपासून मंडळ सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिले आहेत. चेअरमन निमेश पटेल म्हणाले की, माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे कापड मंडई गणेश मंडळ समाज प्रबोधनाचे काम करत आहे. गतवर्षी मंडळास राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष दादू पटेल, माजी अध्यक्ष अमित पटेल, पत्रकार नानक वेदी, शकील खलीफा, गौतम बनकर, मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश आहूजा, संजय ढोकटे, रितेश पटेल दिनेश माळवे, तुळशीराम शिंदे, सुरेश पाटील, सुमित मगरे,गब्बर तांबोळी, मनीष आठवले, पियुष पटेल, बाळू पटेल, सागर पटेल, सागर जटाळ, विकी आठवले, कुशल आठवले, विनोद सरोदे, सागर अंधुरे यांची उपस्थिती होती.