Share

Vasant More | अजित पवारांच्या ऑफरनंतर वसंत मोरेंनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले,

Vasant More । पुणे : मनेसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका लग्नसोहळ्यादरम्यान खूली ऑफर दिली आहे. तात्या राष्ट्रवादीत कधी येताय, वाट पाहतोय, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. सलग तिसऱ्यांदा नगरसेवक पदावर निवडून आणि पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेते झालेले वसंत मोरे मनसेचे पहिलेच नेते आहेत. मात्र ४ महिन्यात वारंवार पुणे मनसेत उफाळणारी नाराजी मनसेसाठी डोकेदुखी ठरु शकते. अजित पवारांच्या ऑफरनंतर आता वसंत मोरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

याविषयी वसंत मोरे यांना विचारले असता, मी अजूनही मनसेतच असल्याचे त्यांनी सांगितले. मला अजून तरी राजसाहेब प्रिय आहेत. परंतु, आता मला पक्षातील बाकीच्यांचा त्रास जाणवू लागला आहे. पूर्वी जो त्रास होत नव्हता, तो आता जाणवत आहे. मला स्टेजवर बोलवायचे आणि बसवून ठेवायचे, मी काय शो पीस नाही ना, असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी विचारला.

दरम्यान, मनसेनं कालच पुण्यातले माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हकालपट्टी केली आणि त्यानंतर जवळपास 400 सदस्यांनी मनसेला रामराम ठोकलाय. पुणे मनसेमध्ये कधी-काळी ३ प्रमुख चेहरे होते. पहिले वसंत मोरे, दुसऱ्या रुपाली पाटील आणि तिसरे साईनाथ बाबर.

यापैकी रुपाली पाटील राष्ट्रवादीत गेल्या आहेत. वसंत मोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आणि साईनाथ बाबर यांना मनसेनं शहराध्यक्ष केलंय. या घडीला पुण्यात मनसेचे दोनच नगरसेवक आहेत. एक वसंत मोरे आणि दुसरे साईनाथ बाबर. त्यामुळे वसंत मोरे भविष्यात राष्ट्रवादीत जाणार कि नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Vasant More । पुणे : मनेसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now