अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात

ajit pawar

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते अनेक नेते,कलाकार,खेळाडू या विषाणूच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

फडणवीस यांना मुंबईतील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर पवार मुंबईतल्या कँडीमध्ये दाखल करण्यात आले आहे. अजित पवारांना कणकण आणि ताप असल्याने आज पुन्हा कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली होती.

त्यानंतर आता राष्ट्रवादीचे मोठे नेते आणी खासदार सुनील तटकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. सुनील तटकरे मुंबईतील कोरोना रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोनातून लवकर बरं होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे, असं तटकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या