Share

Ravi Rana | बच्चू कडूंनी माफी स्वीकारल्यानंतर रवी राणांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Ravi Rana | मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक बच्चू कडू (Bachhu Kadu) व अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यामध्ये मध्यस्थी केली. त्यानंतर रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतले. त्यानंतर रवी राणा यांना माफ केल्याचे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले रवी राणा (Ravi Rana)

देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर मी माझ्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मी दोन पावलं मागे आल्यानंतर बच्चू कडूंनी चार पावलं मागे घेतले आहेत. तसेच त्यांनी माझे आभारही मानले आहे. त्यामुळे आमच्यातला वाद आता मिटला आहे, असं रावी राणा यांनी म्हटलं. रवी राणा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रात तरुणांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच राज्याला आता सक्षम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. ते दोन्हीही माझे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीने आम्ही आता राज्यातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं राणा यांनी सांगितले.

दरम्यान,  रवी राणा यांनी शिंदे आणि फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर दिलगिरी व्यक्त करत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. तर काल बच्चू कडू अमरावतीत आयोजित मेळाव्यात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत रवी राणा यांना माफ केल्याचे म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ravi Rana | मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक बच्चू कडू (Bachhu Kadu) व …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now