fbpx

टोलनाक्याच्या राड्यानंतर खा. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पहिल्यांदाच पवारांसोबत एकत्र

सातारा : आनेवाडी टोलनाक्याच्या राड्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे आज प्रथमच एकत्र आल्याच पहायला मिळाल. त्याला कारण ठरले ते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे.

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी कराड येथील प्रीतिसंगमावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही राजे उपस्थित होते. दरम्यान टोलनाक्याच्या राड्यानंतर दोन्ही राजेंमध्ये विस्तव जात नसताना देखील दोघेही एकाच ठिकाणी आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

तर शरद पवार यांच्या सोबत खासदार उदयनराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, कलाप्पा आवडे, विक्रमसिंह पाटणकर हे खुर्चीत बसले होते. तर शिवेंद्रराजे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर आमदार खाली सतरंजी वर बसले होते.