दमदार विजयानंतर टीम इंडियाने हॉटेलमध्ये जमवली ‘मेहफिल’ ; व्हिडीओ होतोय व्हायरल

hardik pandya

श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने दमदार विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.

भारताच्या विजयासाठी 276 धावांचं लक्ष असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

या दमदार विजयानंतर टीम इंडियाने जोरदार सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सूर्यकुमार यादवने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसले. यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भारतीय खेळाडू गँगस्टर चित्रपटाचे ‘ना जाने कोई कैसी है ये जिंदगानी’ गाणे गाताना दिसत आहेत. या व्हिडिओत इशान किशन, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार हे खेळाडू गाणं गाताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP