इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत चांगल्या सुरुवातीनंतर दुसऱ्या दिवशी भारताचा डाव गडगडला

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे संपुर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने ४ गडी गमावत १२५ धावा केल्या होत्या. भारतीय संघ अद्यापही ५८ धावांनी पिछाडीवर आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजानी सामन्यात वर्चस्व गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजी चांगली कामगीरी करणार अशी अपेक्षा क्रिकेट रसिकांना होती. सलामीवीर रोहित शर्मा(३६) आणि के एल राहुल यांनी ९७ धावांची चांगली सलामी देत भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर मात्र भारतीय डाव गडगडला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने ४६.४ षटकात १२४ धावांवर ४ गडी गमावले होते.

भारताकडून सलामीवीर के एल राहुल १५१ चेंडुत ९ चौकारासंह ५७ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करत खेळपट्टीवर उभा आहे. त्याच्यासोबत यष्टीरक्षक रिषभ पंत ८ चेंडुत १ चौकारासह ७ धावा करुन खेळत होता. पुजाराची डब्ल्युटीसी सामन्यातील अपयशाची कामगीरी या सामन्यातही सुरुच राहीली. त्याने १६ चेंडुचा सामना करताना ४ धावा केल्या. तर कर्णधार कोहली भोपळा न फोडताच माघारी परतला. या दोघांना अँडरसनने बाद केले. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे ५ धावांवर धावबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या