Share

Jio Update | 5G नेटवर्क फोन नंतर Jio आता लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा : देशातील आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी रिलायन्स Jio लवकरच आपला 5G नेटवर्क फोन बाजारात लाँच करणार आहे. त्याचबरोबर जिओ नेहमी आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त प्रॉडक्ट लाँच करत असते. या स्वस्त फोन नंतर जिओ आता स्वस्त लॅपटॉप आपल्या ग्राहकांसाठी लॉंच करण्याच्या तयारीत आहे. जिओ आता JioBook लाँच करण्याच्या तयारीत आहे.

नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, जिओच्या येणाऱ्या नवीन लॅपटॉप ची किंमत सुमारे पंधरा हजार रुपये असेल. जिओ कंपनीचे मालक अंबानीने JioBook साठी ग्लोबल जायंट Qualcomm आणि Microsoft यांच्या सोबत पार्टनरशिप केली आहे. त्याचबरोबर जियो Arm Ltd आणि Windows OS ची पण मदत घेणार आहे.

जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिफोन कंपनी आहे. साधारण 420 दशलक्षाहून अधिक जिओचे ग्राहक आहे. अद्याप कंपनीने या लॅपटॉप बद्दल कोणती माहिती दिलेली नाही. एका रिपोर्टनुसार हा लॅपटॉप या महिन्यापासून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. हा लॅपटॉप 4G एनेबल्ड सह सुसज्ज असेल.

या सेगमेंट मधील या लॅपटॉपची मागणी खूप जास्त असू शकते असे एका अहवालात सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर हा लॅपटॉप पुढील तीन महिन्यांसाठी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. गेल्या वर्षी कंपनीने स्वस्त जिओ फोन लॉंच केला होता त्याचप्रमाणे कंपनी यावर्षी हा स्वस्त लॅपटॉप लॉंच करणार आहे.

Counterpoint च्या अहवालानुसार, जिओ फोन हा या सेगमेंट मधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन आहे. त्याचबरोबर JioBook बाबत असे सांगण्यात आले आहे की हा लॅपटॉप लोकल पातळीवरील लोकांसाठी तयार केला गेलेला असून मार्चपर्यंत कंपनी याचे लाखो युनिट्स विकण्याची योजना करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा : देशातील आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी रिलायन्स Jio लवकरच आपला 5G नेटवर्क फोन बाजारात लाँच करणार आहे. …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now