राज्याला 50 वर्षानंतर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री मिळाला : मोदी

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभा आता अंतिम टप्यात आल्या आहेत. त्यामुळे आज मुंबई येथील बीकेसी मैदानावर महायुतीची संयुक्त सभा पार पडली. या सभेल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही मंचावर उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून येथे विविध क्षेत्रात अनेक संधी आहेत परदेशी गुंतवणूकदारही मुंबईत गुंसवणूक करण्यास उत्सुक असतात.याआधी सरकारमध्ये मंत्रालयावरच लक्ष केंद्रीत होत होते.महायुतीने पाच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री दिला आहे. याआधी कोणालाही ही संधी मिळाली नाही.

जनतेने मजबूत सरकार निवडल्याने हे शक्य झाले आहे. 50 वर्षानंतर पाच वर्षे पूर्ण करणारा मुख्यमंत्री मिळाला आहे.याआधीच्या सरकारने फक्त भ्रष्टाचार करून जनतेची दिशाभूल केली.महायुतीच्या काळात फडणवीस यांनी अनेक विकासकामे केली.जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे.केंद्र आणि राज्यसरकारवर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, असे मोदी म्हणाले.

सरकार आणि संस्कार यातील हा फरक आहे. सर्व कामे आता ऑनलाइन होत आहे. वीज, पाणी, आरोग्य या सेवा सरकारने केल्या आहे.प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही.भाजप सरकार आणि काँग्रेस सरकारच्या करप्रणालीतील फरक जनतेला दिसत आहे.काँग्रेसच्या युपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार जनतेला पाहिला आहे. त्यामुळे आता स्वच्छता अभियानाची ही सुरुवात आहे. आणि इथून पुढे आजून जोरात भ्रष्ट नेत्यांची सफाई होणार आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या शांत होणार आहेत. त्यामुळे आता मतपेटीवर मत नोंदवण्याची वेळ आली आहे. २१ तारखेला मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यात जनता कोणाची सत्ता आणणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या