ऐकावं ते नवलचं… 5 वर्षानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच घेणार पत्रकार परिषद?

टीम महाराष्ट्र देशा : गेली अनेक दिवस विरोधकांकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घायला घाबरतात असा आरोप केला जात आहे. मात्र आता विरोधकांच्या आणि पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला मोदींनी उत्तर द्यायचं असं ठरवले असून मोदी येत्या 26 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत.

वाराणसी येथील हॉटेल ताज गंगा येथे दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद होईल अशी माहिती टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीकडून दिली गेली आहे.वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी पंतप्रधानांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत भाजपाकडून अशी कोणतीही पत्रकार परिषद होणार नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

या पत्रकार परिषदेतून मोदी आपण केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडतील.विविध आरोप,जनतेला पडलेले प्रश्न या सर्वांची मोदी नेमकी काय उत्तरं देतात हे लवकरच स्पष्ट होईल.