fbpx

‘औरंगाबाद,अहमदनगर आणि सोलापूरात २२ जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला जाणार’

औरंगाबाद : मराठवाड्यात येत्या २२ जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला जाणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे. कृत्रिम पावसाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शासनानं त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. यामध्ये औरंगाबाद, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. आतापर्यंत १२२ मिमी पावसाची नोंद याठिकाणी झाली आहे. एवढ्या कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात कृत्रिम पावसाची गरज आहे. येत्या २२ तारखेनंतर येणाऱ्या ढगांमध्ये पाण्याची घनता जास्त असेल, त्यावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग निश्चित यशस्वी होऊ शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.