अखेर २२ महिन्यानंतर कुलभूषण जाधव आणि कुटुंबियांची भेट

kulbhushan jadhav

टीम महाराष्ट्र देशा: हेरगिरीच्या प्रकरणात पाकिस्तानमध्ये अटकेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई व पत्नी आज पाकिस्तानला गेल्या आहेत. २२ महिन्यानंतर कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट झाली आहे. पाकिस्तानातील परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात ही भेट झाली आहे कुलभूषण यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पाकिस्तानकडून केवळ अर्धा तासांचा अवधी देण्यात आला  होता. यावेळी जाधव यांच्या कुटुंबियांसोबत भारताचे उप-उच्चायुक्त जे पी सिंह सुद्धा उपस्थित होते. कुलभूषण जाधव यांना कडक पोलीस बंदोबस्तात परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात आणण्यात आले. व त्यानंतर त्यांच्या आई व पत्नी यांनी कुलभूषण यांची भेट घेतली.

20 डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने व्हिसा जारी केला होता. त्यामुळे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी जाण्याचा कुटुंबीयांचा मार्ग मोकळा झाला होता. हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपिलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती.

2 Comments

Click here to post a comment