औरंगाबादः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ते शहरात दौऱ्यावर आहेत. २०११ नंतर सरसंघचालक पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये येत आहेत. त्याचबरोबर त्यांचा शहरात ५ दिवसांचा मुक्काम असणार आहे. संघटनात्मक कार्यासंबंधी बैठकांचे आयोजन या काळात केले जाणार आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह संचारला आहे.
११ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथील श्री संत नामदेव महाराजांचे व गुरुद्वाराचे दर्शन घेऊन संध्याकाळी औरंगाबादेत येतील. याच दिवशी संघाच्या नगर स्तरावरील कार्यकर्त्यांचा सहकुटुंब एकत्रिकीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात सरसंघचालक मोहन भागवत हे पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन या विषयांवर स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. १२,१३ आणि १४ रोजी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका घेण्यात येणार आहे.
पहिल्या दोन दिवसात प्रामुख्याने औरंगाबादमधील पूर्णवेळ कार्य करणाऱ्या प्रचारकांच्या आणि प्रांत कार्यकारिणी मंडळाच्या बैठका आणि काही स्वयंसेवकांच्या भेटी घेणार आहेत. १४ नोव्हेंबर रोजी संघाच्या विविध संस्था, संघटनांची समन्वय बैठक होईल. यात सरसंघचालक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करतील. १५ नोव्हेंबर रोजी ते विमानाने हैदराबाद मार्गे कोलकत्याला रवाना होतील. सिडकोतील अग्रसेन भवनात सरसंघचालकांच्या पाच दिवसीय दौऱ्यातील सर्व महत्त्वाचे कार्यक्रम सिडकोतील अग्रसेन भवन येथे आयोजित करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दोन्ही राजेंची बिनविरोध निवड
- ‘आम्ही भडकवले तरी एसटी कर्मचारी मूर्ख नाहीत, ते न्याय हक्कासाठी लढत आहेत’
- एसटीचा संप संपेना! मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
- पडळकर आणि सदाभाऊ कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का?-अनिल परब
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<