तब्बल 20 कोरोना टेस्ट !  मी कोरोना टेस्ट क्वीन बनले – प्रिती झिंटा

zinta

दुबई : भारतातील करुणा चा प्रादुर्भाव लक्षात घेत इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल या स्पर्धेचे आयोजन यूएई मधील दुबई शहरात करण्यात आला आहे. त्यावेळी येथे सर्व खबरदारी घेत सामने खेळले जात आहेत. करुणा संबंधित खबरदारी कोरोना टेस्टिंग सोशल डिस्टंसिंग आणि मास चा वापर यासह अनेक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.

यावेळी आयपीएलमध्ये ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या युएईमध्ये आहे. प्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोरोना टेस्ट करताना दिसत आहे. या टेस्टमध्ये आपण तज्ज्ञ झाल्याचे तिने म्हटलंय. प्रतीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, मी कोरोना टेस्ट क्वीन बनले आहे. ही माझी २० वी कोरोना टेस्ट आहे.

प्रतीने पुढे व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रत्येकजण मला विचारतो की आयपीएलच्या टीम बायो बबलमध्ये राहणे कसे असते. तर सांगते हे ६ दिवसांच्या क्वारंटाईनने सुरू होते. कोविड टेस्ट दर ३ते ४ दिवसांनी आणि बाहेर पडायचे नाही. फक्त आमची खोली, किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी ठरलेले रेस्टॉरंट, जीम आणि कारमधून स्टेडियम. ड्रायव्हर्स, शेफ सर्वजण बायो बबलमध्ये राहतात. म्हणून बाहेरून अन्न नाही, लोकांशी कोणताही संवाद नाही. तुम्ही जर माझ्यासारखी फ्री बर्ड असाल तर हे खूप कठीण आहे परंतु हे २०२० आहे. कोरोना साथीच्या काळात आयपीएलचे आयोजन झाले यातच खूश राहिले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-