२ वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरूख खानच पुन्हा कमबॅक; तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला !

SRK

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरूख शेवटचा झिरो चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. त्यानंतर शाहरुखच्या कोणताही चित्रपट आला नव्हता. त्यामुळे आता त्याचे चाहते त्याच्या कमबॅकची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे. तब्बल दोन वर्षानंतर आता शाहरूख कमबॅक करतो आहे. त्याने एक नाही 2 नाही तब्बल तीन चित्रपट साईन केले आहेत.

शाहरुख खानलवकरच पठाण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यानंतर तो राजकुमार हिरानी आणि एका दाक्षिणात्य फिल्ममेकरच्या चित्रपटातही काम करणार आहे. एकीकडे शाहरूखच्या पठाण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असतानाशाहरुख खानपहिल्यांदाच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक एटली यांच्यासोबत काम करणार असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमामध्ये शाहरुखचा डबल रोल असेल. या आधी त्याने ड्युप्लीकेट आणि डॉन या सिनेमांमध्ये डबल रोल साकारला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा शाहरूख डबल रोल करणार आहे. यामध्ये शाहरुख मुलगा आणि वडीलांची भूमिका साकारणार आहे. 2 पिढ्यांमधील अंतर हा विषय या सिनेमामध्ये हाताळला जाणार आहे.

या चित्रपटात शाहरुख एका सीनिअर रॉ एजंटच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या फिल्ममध्ये मेकअपवर बराच भर देण्यात आला आहे. शाहरुखच्या लूकवर या सिनेमात खूप मेहनत घेण्यात येत आहे.पठाण सिनेमामध्ये शाहरुख खानसोबतजॉन अब्राहम आणि;दीपिका पादुकोण;यांच्याही भूमिका आहेत. नोव्हेंबर महिन्यात पठाण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. पहिल्या शेड्यूलमध्ये शाहरुखचे शूटिंग होणार आहे. तर जानेवारीमध्ये पठाणच्या दुसरे शेड्यूल सुरू होणार आहे. त्यात;जॉन अब्राहम आणि;दीपिका पादुकोणयांचे शूटिंग होणार आहे. मुंबईच्या यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये शाहरुख शूट करणार आहे.

महत्वाच्या बातम्या