तब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर

टीम महाराष्ट्र देशा : ‘मेला’ या चित्रपटामधून स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता फैजल खान पुन्हा एकदा तब्बल १९ वर्षांनी चंदेरी पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार आहे. फैजल खान हा अमीर खानचा भाऊ असून बाल कलाकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. आता फैजल खान दिग्दर्शक शारिक मिन्हाज यांच्या ‘फॅक्ट्री’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याआधी फैजल खान याने ‘प्यार का मौसम’,‘मदहोश’, ‘मेला’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. मेला या चित्रपटात भाऊ अमीर खान बरोबर फैजल ने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी फैजल खान ‘फॅक्ट्री’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच या चित्रपटातून तो सिंगर म्हणूनही डेब्यू करतोय. याआधी शारिक मिन्हाज यांच्याबरोबर ‘चांद बुझ गया’ आणि ‘चिनार ए दास्तान’ असे दोन चित्रपट देखील केले आहेत.