१५ ऑगस्टनंतर जम्मू-काश्मीरमधील जमावबंदी हटवणार : राज्यपाल

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु हा निर्णय घेताना केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू केली होती. परंतु ती आता हटवण्यात येणार आहे.

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी याविषयीची माहिती दिली. त्यांनी १५ ऑगस्टनंतर राज्यातील वाहतुकीवर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येतील तसेच फोन, इंटरनेट ही माध्यमे युवकांना भडकवण्याची तसेच त्यांची दिशाभूल करण्याची कामे करतात. त्यामुळे राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोवर यावरील निर्बंध कायम राहतील अशी माहिती दिली.

Loading...

तसेच पुढे बोलताना आठवडाभरात किंना दहा दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल. त्यानंतर इंटरनेट आणि फोनवरील निर्बंधदेखील हळूहळू उठवण्यात येणार असल्याचे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे माहितीचा अभाव आहे. राहुल गांधी यांना काश्मीरमध्ये येण्यासाठी दिलेले निमंत्रणही मी मागे घेतले आहे अशी टीका केली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी काश्मीरमधील परिस्थिती अशांत असल्याच म्हटले होते. यावर मलिक यांनी गांधी यांना निमंत्रण दिले होते. यावेळी राहुल गांधी यांनी आम्हाला काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्या द्या. तिथल्या आघाडीच्या नेत्यांशी बोलण्याचे स्वातंत्र्य द्या अस अशी मागणी केली होती ती राज्यपालांनी आता फेटाळली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
स्वतःला प्रबोधनकार म्हणवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी माफी मागावी
शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक