आणखी एका पत्रकारावर जीवघेणा हल्ला

pankaj misahra

वेबटीम : दोन दिवसापूर्वी कर्नाटक ची राजधानी बंगळूरू मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच बिहार मधील अरवल जिल्ह्यात अजून एका पत्रकाराला गोळी मारून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बिहार मधील अरवल जिल्ह्यातील बाशी परिसरामध्ये राष्ट्रीय सहारा या हिंदी वर्तमानपत्राचे वार्ताहर पंकज मिश्रा यांचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिश्रा यांनी गुरुवारी बँकेतून एक लाख रुपये काढले होते. आणि पैसे घेऊन निघाले असतानां हल्लेखोरांनी त्यांचाकडील रोख रक्कम हिसाकवन्याचा प्रयत्न केला. मिश्रा यांनी विरोध केल्यामुळे त्यांना गोळी मारण्यात आली. जखमी पंकज मिश्रा यांना स्थानिक नागरिकांनी हॉस्पिटल मधे भरती केले असून त्यांचावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान संशियत आरोपी अंबिका महतो आणि कुंदन यांना पोलिसांनी अटक केली आहे. पंकज मिश्रा यांची प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोर जेडीयू चे आमदार सत्यदेव यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे.