fbpx

अफगाणिस्तानमध्ये राज्यपालांच्या निवासाबाहेर स्फोट, १५ मृत्यूमुखी

भारतीय वृत्त संस्था – अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतांच्या राज्यापलांच्या निवासाबाहेर झालेल्या एका आत्मघाती हल्ल्यामध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४० लोक जखमी झाले आहेत.

काबूल येथील तोलो न्यूजच्या एका वृत्तानुसार, एका व्यक्तिने पूर्व नांगरहार प्रांतामधील जलालाबाद शहरामध्ये स्फोट घडवून आणला. हा स्फोट स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता झाला आहे. यासंदर्भात कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही.