महाराष्ट्र देशा डेस्क: भारतात कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणार्या बाईक्सना नेहमीच मागणी असते. त्यातच सध्या वाढत असलेले पेट्रोल, डिझेलचे भाव बघता अश्या बाईक्सची मागणी जरा जास्तच वाढली आहे. हेच लक्षात घेऊन बाईक निर्मिती करणाऱ्या नामवंत कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अश्या स्वस्त बाईक्स बाजारात आणल्या आहेत. कमी किंमतीबरोबरच स्टयलिश लुक, कमी वजन आणि जास्त मायलेज ही या बाईक्सची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हालाही बाईक घ्यायची असेल तर कमी बजेटमध्ये अधिक मायलेज देणार्या अश्याच टॉप 3 बाईक्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Bajaj CT110: बजाज सीटी 110 मध्ये सिंगल सिलेंडर 115 सीसी चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.6 पीएस पॉवर आणि 9.81 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. त्याचबरोबर बजाज सीटी 110 ही बाईक सर्वाधिक म्हणजेच 104 kmpl एवढे मायलेज देते आणि याबद्दल या बाईकला ARAI ने प्रमाणित सुद्धा केले आहे. बजाज सीटी 110 ची मूळ किंमत 59,104 रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटनुसार 65,453 रुपयांपर्यंत वाढते.
Hero HF Deluxe: Hero HF Deluxe मध्ये 97.2 सीसी चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 8.02 पीएस पॉवर आणि 8.05 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 4 स्पीड गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. कंपनीचा म्हणण्यानुसार Hero HF Deluxe 83 kmpl एवढे मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Hero HF Deluxe ची सुरुवातीची किंमत 56,070 रुपये आहे जी टॉप व्हेरियंटनुसार 64,520 रुपयांपर्यंत जाते.
Bajaj Platina 100: बजाज सीटी 110 प्रमाणेच बजाज प्लॅटिना 100 हि बाईक देखील कमी किमतीत जास्त मायलेज देते. या बाईकमध्ये 102 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 7.9 पीएस पॉवर आणि 8.3 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की ही बजाज प्लॅटिना 75 ते 100 kmpl मायलेज देते. बजाज प्लॅटिना 100 ची सुरुवातीची किंमत 61,152 रुपये आहे जी टॉप व्हेरियंटनुसार 75,189 रुपयांपर्यंत वाढत जाते.
महत्वाच्या बातम्या:
- Sandip Deshpande | शिवाजी पार्क मैदानावरील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प मोडीस निघाला- संदीप देशपांडे
- Affordable bikes । कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक घ्यायची आहे?; पहा “या” आहेत 65000 पेक्षा कमी किंमतीच्या बाईक्स
- Clyde Crasto : “केसरकर मंत्रिपदाच्या आशेने स्वतःची…”, पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
- Shahajibapu Patil : भविष्यात शिंदे-ठाकरे एकत्र येणार?; शहाजीबापू म्हणाले…
- Nilesh Rane :”दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर निलेश राणेंचा इशारा
- IND vs ENG : भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद; पाहा VIDEO!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<