fbpx

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय टीमचा धडाकेबाज माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप गौतम गंभीरला दिल्लीमधून लोकसभेची उमेदवारी देऊ शकते अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धडाकेबाज फलंदाजीसाठी गंभीरला ओळखले जायचे.क्रिकेटमध्ये नशीब आजमावल्या नंतर आता गंभीर राजकारणात नशीब अजमावणार आहे. मला ही संधी दिल्याबद्दल भाजपचे धन्यवाद मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी पहिली प्रतिक्रिया गौतम गंभीरने दिली.

दरम्यान,गंभीरला भाजपकडून नवी दिल्लीमधून मैदानात उतरवण्याची जोरदार तयारी सुरु आहे. खासदार मीनाक्षी लेखी यांच्या जागी गौतम गंभीरला उमेदवारी मिळू शकते असा अंदाज लावला जात आहे .