fbpx

पद मिळाल्यावर नीट वागा,अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा : भाजपसाठी संकटमोचक ठरणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या होमग्राउंड जळगावमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी पहायला मिळाली आहे. हाणामारी कार्यकर्त्यांमध्ये अथवा दोन वेगळ्या पक्षातील नेत्यांमध्ये झाली नसून भाजपच्याच जेष्ठ नेत्यांमध्ये झाली आहे.

अमळनेर येथे बुधवारी भाजपच्या मेळाव्यात दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ट्रोल करण्यात येत आहे.दरम्यान,आता याच मुद्द्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.

पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते.जळगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी मंचावर केलेली हाणामारी आणि नगरमध्ये विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना भाषणापासून थांबवणे, यामुळे भाजपमधील हुकूमशाही, दडपशाही चव्हाट्यावर आली आहे. यामुळे पक्षाची अब्रू जाते. तेव्हा पद मिळाल्यावर नीट वागा,’ असा मोलाचा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.