fbpx

संतापजनक : निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीचा जाहिरातीत फोटो

टीम महाराष्ट्र देशा- पंजाबमधील होशियारपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर पोस्टर छापले. या पोस्टरवर चक्क निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी मुकेशचा फोटो वापरला गेला.या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

झी २४ तास या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘निर्भया’ कांडातील बलात्कारी दोषी मुकेशला पोस्टरबॉय बनलाय.हे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यातही आले. एक पोस्टर ट्विटरवर झळकल्यानंतर पोस्टरबॉय बलात्कार प्रकरणातला दोषी मुकेश असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री विजय संपला यांनी केलीय.